एका अनोळखी युवतीची रहेजा कॉम्प्लेक्स समोरील स्कायवॉकवरून आत्महत्या

एका अनोळखी युवतीनं काल रात्री ११च्या सुमारास रहेजा कॉम्प्लेक्स समोरील स्कायवॉक वरून उडी मारून आत्महत्या केली. तीन हात नाक्याजवळ रहेजा कॉम्प्लेक्स असून रहेजा कॉम्प्लेक्स समोर स्कायवॉक आहे. या स्कायवॉकवर रात्री ११ च्या सुमारास ही युवती गेली आणि तिने स्कायवॉक वरून उडी मारली. जखमी अवस्थेत तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिची ओळख अद्याप पटू शकली नसून तिनं आत्महत्या का केली याचंही कारण समजू शकलं नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading