मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांविरोधात वाहतूक शाखेनं उघडलेल्या मोहिमेत २ हजाराहून अधिक तळीरामांवर कारवाई

नववर्षाच्या पूर्वसंध्येवर मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या एकूण २ हजाराहून अधिक तळीरामांवर ठाणे वाहतूक शाखेनं कारवाई केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येवर म्हणजे ३१ डिसेंबर या एकाच दिवशी १६७३ तळीरामांवर कारवाई करण्यात आली तर मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत तीन दिवसात २ हजार १४३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. ठाणे वाहतूक शाखेतर्फे गेली काही वर्ष मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांविरोधात कारवाई केली जाते. यंदाही २९ डिसेंबर पासून अशी कारवाई सुरू करण्यात आली होती. वाहतूक शाखेच्या १८ विभागातर्फे ६०० पोलीस या कारवाईत सहभागी झाले होते. २९ आणि ३० डिसेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत ५४ श्वास विश्लेषकांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत ४७० वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ३१ डिसेंबर या एकाच दिवशी करण्यात आलेल्या कारवाईत १६७३ तळीरामांवर कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading