ठाण्यातील नालंदा भरतनाट्यम् निकेतननं सिंगापूर येथे नृत्याचा झेंडा रोवला

ठाण्यातील नालंदा भरतनाट्यम् निकेतननं सिंगापूर येथे आपला नृत्याचा झेंडा रोवला आहे. सिंगापूरमध्ये झालेल्या नवव्या कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्टस् या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नृत्यस्पर्धेत नालंदा भरतनाट्यम् नृत्यनिकेतनच्या संघानं सेमी क्लासिकल सिनियर या कॅटॅगरीमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. भरतनाट्यम् नृत्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आजच्या युगात स्त्रीनं स्वत: सक्षम राहून मुक्त जीवन कसं जगावं या विषयावरील नृत्य या संस्थेनं सादर केलं होतं. या नृत्याची रचना के. शोभना यांनी केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading