एकाच संपर्क क्रमांकावर उपलब्ध होणार हॉस्पिटल्स, बेडस व्यवस्थेसह रुग्णवाहिकेची माहिती

नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता शहरात उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती आता ७३०६३ ३०३३० या एकाच संपर्क क्रमांकावर मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली आहे. कोविड वॉर रूम अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता तात्काळ कोविड हॉस्पिटल्लमध्ये बेडस् उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कोविड वॉर रूमचे सक्षमीकरण करून वॅाररूमध्ये आणखी नवीन हेल्पलाईन संपर्क क्रमांक वाढविण्यासोबतच मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर वॅाररूममधील सर्वच संपर्क क्रमांक एकाच क्रमांकाने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता संपर्क क्रमांक बिझी असल्यामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता तात्काळ संपर्क साधून उपलब्ध माहिती घेता येणार आहे. वॉर रूमच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ७३०६३ ३०३३० या क्रमांकाशी इतर २० संपर्क क्रमांक जोडण्यात आल्याने नागरिकांना तात्काळ प्रतिसाद मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading