एकमेकांवरच प्रेम करू नका तर आपल्या आरोग्यावरही प्रेम करा – परिषा सरनाईक

व्हॅलेन्टाईनला केवळ कोणी कोणावर प्रेम करण्याचा संदेश दिला जात नाही, एकमेकांवरच प्रेम करू नका तर आपल्या आरोग्यावरही प्रेम करा असा संदेश नगरसेविका परिषा सरनाईक यांनी ठाणेकरांना दिला. व्हॅलेन्टाईन डे आणि ४ जानेवारीचा कर्करोग दिन या दोन्हीचं औचित्य साधत परिषा सरनाईक यांनी विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं टाटा हॉस्पिटलला कर्करोगाची ट्रीटमेंट घेण्यासाठी ठाण्यातून जाणा-या रूग्णांना जाण्यासाठीच्या कार्डीक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. आजपासूनच ही रूग्णवाहिका रूग्णांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दर रविवारी धावण्याचा व्यायाम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळं आजपासूनच्या व्हॅलेन्टाईन डे ला आपण एकमेकांपेक्षा आपल्या आरोग्यावर प्रेम करून आपण स्वत: निरोगी राहू असा मंत्र यावेळी देण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading