टिटवाळा रेल्वे स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल बंद

टिटवाळा रेल्वे स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल बंद करण्यात आला आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकातील हा पूल काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. काल मध्यरात्रीपासून हा पूल काढण्याचं काम सुरू करण्यात आलं असून ते उद्यापर्यंत चालणार आहे. या पूलाच्या जागी लवकरच नवीन पूल बांधला जाणार आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकातील ईगतपुरीकडील बाजूस असलेल्या तिस-या पूलाचं काम प्रगतीपथावर असून येत्या एप्रिलपर्यंत हा पूल पूर्ण होईल असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. प्रवाशांनी कल्याणकडील नवीन पूलाचा वापर करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading