एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे बाहुबली – ठाण्यातील फलकाने लक्ष वेधले

राजकीय नेत्यांचा कमालीचा उदो उदो करण्याचं दक्षिणेतील पेव ठाण्यातही आलं असून एकनाथ शिंदे यांना बाहुबलीचं रूप देण्यात आलं आहे. शिवसेना दक्षिण भारतीय विभागानं एकनाथ शिंदे यांची प्रतिमा बाहुबलीच्या रूपात उभारली आहे. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोरच एकनाथ शिंदे यांचा बाहुबली रूपातील भव्य फलक लावण्यात आला आहे. या फलकावर बाहुबलीची प्रतिमा असून त्यावर एकनाथ शिंदे यांचं छायाचित्र लावण्यात आलं असून त्यांच्या हृदयात आनंद दिघे तर एका बाजूला विधानसभा आणि दुस-या बाजूला शिवसेना प्रमुखांचं छायाचित्र दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे गेली अडीच वर्ष भक्कम असलेल्या आघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे. या फलकातून एकप्रकारे शिंदे यांनी केलेलं कृत्य बाहुबलीचं असल्याचंच दर्शवण्यात आलं आहे. या फलकावर विजयी भव असा संदेश असून शिवसेना दक्षिण भारतीय विभागानं हा फलक लावल्याचं दिसत आहे. सध्या हा फलक चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading