उपवन येथे पहिल्यांदाच वंडरलँड फेस्टिवलचे आयोजन

संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नाताळ निमित्त २३ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत उपवन येथे वंडरलँड फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त उपवन जेट्टी येथे ख्रिसमस ट्री उभारण्यात येणार असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यामुळं उपवन तलाव जेट्टीच्या परिसराला वेगळीच झळाळी मिळणार आहे. सर्व जाती-धर्माचे उत्सव मोठ्या आनंदात साजरे करण्यासाठी नाताळ सणामध्ये ठाणेकरांना सहभागी व्हावे यासाठी हा अनोखा प्रयत्न पुर्वेश सरनाईक यांनी केला आहे.
तसेच लोकमान्यनगर-शास्त्रीनगर विभाग आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी संस्कृती कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन २४ ते २७ डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. संस्कृती कला-क्रीडा महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून यामध्ये बुध्दिबळ, कॅरम, क्रिकेट, स्विमिंग, चित्रकला, रांगोळी, पाककला, गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, मिस-मिसेस लोकमान्यनगर आणि होम-मिनिस्टर या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाअंतीम सोहळा, बक्षिस समारंभ, महिलांसाठी ’होम-मिनिस्टर खेळ पैठणीचा“ हि विशेष स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी लकी-ड्रॉ चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये फ्रीज, सायकल, वॉशिंग मशीन, फूड प्रोसेसर, स्मार्ट टीव्ही, गॅस स्टोव्ह, मायक्रोवेव्ह, व्हॅक्युम क्लिनर, वॉटर प्युरिफायर, साऊंड बार, प्रिंटर अशी बक्षिसे लकी-ड्रॉ विजेत्यांना देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्कृती युवा प्रतिष्ठानचे पुर्वेश सरनाईक यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading