उपचार सुरू असतानाही एकनाथ शिंदेचं काम सुरू

पालकमंत्री एकनाथ शिंदे हे कोरोना संसर्गामुळे रूग्णालयात उपचार घेत असतानाही आपलं नियमित काम करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांना २४ सप्टेंबरला कोरोना संसर्गामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र रूग्णालयात असताना कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामं आपल्यामुळे अडून राहू नये म्हणून त्यांनी रूग्णालयातूनच कामाला सुरूवात केली आहे. आज त्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच काही कागदपत्रं हातावेगळी करून स्वाक्ष-या केल्या. आपली तब्येत सुधारत असून आपण लवकरच परत जनसेवेकरिता रूजू होऊ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading