उध्दव ठाकरेंच्या चेह-यावर सत्ता गेल्याचं दु:ख दिसत असल्याची नरेश म्हस्केंची टीका

उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचे दुःख दिसत होतं. प्रसार माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे न देता त्यांनी चिडचिड केली त्यावरून हे स्पष्ट दिसत होते अशी टीका शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. आज एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांची उत्तरं न देता ते निघून गेले. त्यावरून शिंदे गटातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के बोलत होते. सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा डाव फसला आहे. महिलेच्या पदरा आड राहून केलेले आरोप बालिश आहेत. रोशनी शिंदे या सातत्त्याने आक्षेपहार्य लिहित आहेत. थोडी बाचाबाची झाली होती तिथेच विषय संपला होता पण नंतर तिला खासदार राजन विचारे यांचा सल्ला तिला मिळाला. आणि त्या महिलेने उलट्या आल्या डोकं दुखतंय असं नाटक केलं. सिव्हिल हॅास्पिटलचा रिपोर्ट आला खाजगी हॅास्पिटलचा रिपोर्ट आला पण तिला मारहाण झाली नाहीये ती गर्भवती नाही आहे. ज्या फडणवीसांना तुम्ही फडतूस म्हणालात त्यांचे काडतूस घुसले म्हणुन तुम्ही सत्तेतून बाहेर पडलात. देवेंद्र फडणवीसांना लाळघोटे आणि फडतूस बोलले परंतु हा डाव फसल्याचं उध्दव ठाकरे यांच्या चेह-यावर दिसत होतं असं म्हस्के यांनी सांगितलं. मी आणि माझे कुटूंब अशी अवस्था त्यांची होती. मंत्र्यांना गुंड बोलताय , आपण मुख्यमंत्री होण्या करता कोणा कोणाची चाटली. तुम्हाला हे शोभत नाही. राजन विचारें मध्ये आरोप करण्याची हिम्मंत नाही. राज्याची जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे. महिलेच्या पदरा आड का दगड मारता? अशी घणाघाती टीका म्हस्के यांनी केली. खासदार राजन विचारे यांच्या मित्राच्या हॅास्पिटल मध्ये एडमिट केले गेले आणि पाहिजे तसा रिपोर्ट मिळेल असं त्यांना वाटलं पण डॅा. उमेश आलेगावकर डॅाक्टरी पेशाला जागले आणि त्यांनी खरे सांगितल्याच नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading