उद्या म्हणजे मंगळवार २ जुलै रोजी ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी होणारं खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. हे सूर्यग्रहण भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजून २५ मिनिटांपासून उत्तररात्री ३ वाजून २० मिनिटांपर्यंत होईल. १६ जुलैला होणारं खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरूवारी २६ डिसेंबर रोजी होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.