उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणा-या भामट्यास वागळे गुन्हे शाखेनं केलं जेरबंद

चित्रपट, मालिका तसंच जाहिरातीमध्ये काम मिळवून देतो अशी बतावणी करून उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणा-या भामट्यास वागळे गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. डोंबिवलीतील रवींद्र कुलकर्णी यांच्या अद्वैत या मुलास असं काम मिळवून देण्यासाठी पोर्टफोलिओ तयार करण्याकरिता या भामट्यानं ११ हजार रूपये घेतले होते. मात्र त्यानं कामही मिळवून दिलं नाही आणि पोर्टफोलिओही दिला नाही म्हणून कुलकर्णी यांनी पोलीसांकडे तक्रार केली होती. या प्रकरणात संदीप व्हरांबळे याला पोलीसांनी अटक केली आहे. त्यानं विविध ठिकाणी असे प्रकार केले असून त्याच्यावर अशाप्रकारचे १७ गुन्हे दाखल आहेत. त्यानं आत्तापर्यंत १०० ते दीडशे उदयोन्मुख कलाकारांची १० ते १५ लाखांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading