उत्तन येथील मच्छीमारांसाठी सुरू असलेल्या ब्रेक वॉटर प्रकल्पाची आणि तीन दीपस्तंभच्या कामाची खासदार राजन विचारेकडून पाहणी

खासदार राजन विचारे यांनी भाईंदर उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून सुरू असलेल्या ब्रेक वॉटर प्रकल्पाची आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत समुद्रामध्ये दिशादर्शक दाखविणा-या दीपस्तंभाची पाहणी काल अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आली. या प्रकल्पाची पाहणी करण्यापूर्वी पाली उत्तन मच्छिमार आणि वाहतूक सोसायटी हॉल येथे उपस्थित असलेल्या मच्छीमारांच्या समस्यांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांच्या समोरासमोर निर्णय घेऊन कामास सुरुवात करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर ब्रेक वॉटर प्रकल्पाची पाहणी करून हे काम लवकर मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. उत्तन मध्ये पहिल्यांदाच ४५ कोटी रुपये खर्च करून एवढे मोठे काम होत आहे त्यात खंड पडू नका ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्यास वाढीव निधी आणून आपण ते पूर्ण करू असे आश्वासन उपस्थित असलेल्या मच्छीमारांना दिले. मच्छीमारांच्या बोटी खडकावर आढळून होणारे नुकसान टाळण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन विभागाकडून ३ कोटी निधी मंजूर करून आणलेल्या कातल्याचा खडक, साऱ्याचा खडक, वाशी खडक या तीन खडकांवर दीपस्तंभ उभारणीच्या कामाची सुरुवात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणपतीनंतर या कामास सुरुवात करण्यात येईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading