सुल्झर पंप्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये भव्य वेतनवाढीचा करार

सुल्झर पंप्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये भव्य वेतनवाढीचा करार करण्यात आला. कोरोना महामारी आणि रशिया युक्रेन संघर्षामुळे भारतासह जगभरातील उद्योगधंदे त्रस्त झाले आहेत. सुल्झर पंप्स् इंडिया ही जागतिक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. सुल्झर कंपनी हि उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेले API पंप बनवते. इतर अनेक कंपन्यांनी ही API पंपांच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत पगारवाढीचा करार करणे म्हणजे मोठे अग्निदिव्यच होते.
काही सेवानिवृत्त असंतुष्ट माजी कर्मचारी जे स्वतःला खूप मोठे कामगार नेता समजत होते, ते कंपनीच्या कामगारांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. ते कंपनी आणि कामगारांचे शोषण करत होते. कामगारांना वेतन वाढीच्या करारापासून वंचित ठेवण्याचा डाव रचत होते. वेतनवाढीचा करार रोखण्यासाठी त्यांनी कोर्टात सुध्दा धाव घेतली. त्यांनी जवळपासच्या दोन कंपन्यांमध्ये वेतन वाढीचा त्रैवार्षिक करार केला आहे. त्या कंपन्यांच्या वेतन वाढीच्या त्रैवार्षिक कराराची रक्कम ९ हजार २०० आणि १३ हजार ३०० रूपये आहे. अशा कठीण परिस्थितीत कामगारांनी एकजुटीने सन २०२० रोजी एक क्रांती घडवून आणली आणि युनियन आपल्या ताब्यात घेतली. यावर्षी ९ ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य साधून एक नवीन क्रांती घडवून आणण्याचे कामगारांनी ठरविले आणि सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईस युनियनचे अध्यक्ष रुपेश पवार आणि जनरल सेक्रेटरी संजय आंब्रे यांच्या नेतृत्वाखालील सेऊच्या युनियन कमिटीने कंपनीशी यशस्वी वाटाघाटी करून हा करार केला. या वेतन वाढीच्या त्रैवार्षिक कराराची रक्कम सरासरी २८ हजार रूपये आहे. हा त्रैवार्षिक भव्यदिव्य करार करून सेऊच्या युनियन कमिटीने कामगारांना गणपतीच्या आगमना पुर्वीच मोठी आनंदाची भेट दिली. या वेतनवाढीच्या कराराच्या तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला कामगारांचे कमाल वार्षिक वेतन आता २२ लाख ८६ हजार ७४७ रूपये होईल तसेच दुसरे कमाल वार्षिक वेतन २२ लाख ३५ हजार ६९४ रूपये होईल. कामगारांनी या कराराचा आनंद साजरा करत ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत युनियनचे अध्यक्ष रुपेश पवार आणि त्यांच्या कमिटी सभासदांना खांद्यावर घेऊन सभा स्थळापर्यंत मिरवणूक काढली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading