आरोग्य पर्यवेक्षिकांचे पोषाहार प्रात्यक्षिक

परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय वि सा सामान्य रुग्णालय येथील ७७ वी स्त्री आरोग्य पर्यवेक्षीका या बॅचचे पोषाहार प्रात्यक्षिक सादर मा जिल्हा शल्यचिकीत्सक कैलास पवार यांचे अध्यक्षतेखाली आणि परिचर्या अधिकारी सिदधी बांदेकर यांच्या मार्गदर्शनाने पार पडले.
सदर प्रात्यक्षीकाचे विषय हा भरड धान्य आहार हा होता कारण युनायटेड नेशन्स ने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषीत केले आहे. भरड धान्य मध्ये नाचणी,बाजरी,कोद्रा ,भगर, राळ, ज्वारी तांदूळ गहू, मका, कांगणी, कुटकी ई.पौष्टिक धान्यांचा समावेश होतो. धान्यामध्ये रेचक आणि इतर आहारमुल्य कॅल्शियम,विविध खनिजे, जीवनसत्त्वे प्रथिने,लोह ,आवश्यक कॅलरिज, मिळतात . विविध भरड धान्याचा वापर करुन आपण रुचकर पदार्थ तयार करु शकतो पण त्याचबरोबर तो पौष्टीक पण होतो . या पदार्थांमुळे अतिरिक्त चरबी शरीरात वाढत नाही. लहान बाळांपासुन ते स्तनदा आणि गर्भवती माता तसेच लहानथोर आवडीने हे पदार्थ खाऊ शकतात आणि आपली आवश्यक आहरिय मूल्यांची पूर्तता ही भरून निघते.पूर्वीची बरीच भारतीय धान्य हळू हळू लुप्त पावली आहेत.तसेच आपल्या भारतीयांच्या आहारात ६० टक्के वाटा हा धान्याचा असतो म्हणून आहारात वेगवेगळ्या भरड धान्याचा समाविष्ट करून आहरीय दर्जा वाढावा ह्याबद्दल जनजागृति करण्याच्या दृष्टीने या विद्यार्थीनीना विविध प्रकारची भरड धान्य बनविण्यास प्रोत्साहीत केले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading