आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे लव्ह यू जिंदगी या आरोग्य विषयक उपक्रमाचं लोकार्पण

आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे लव्ह यू जिंदगी या आरोग्य विषयक उपक्रमाचं आज लोकार्पण करण्यात आलं.
कोरोनाची परिस्थिती बघता मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून यावर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरे होणारे सर्व उत्सव रद्द करून त्या निधीचा विनियोग कोरोना संकटकाळात आणि भविष्यातही ओवळा-माजिवडा मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठरवले आहे. या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावे या मंगेश पाडगांवकराच्या ओळींचा अर्थ प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे हे लक्षात घेऊन लव यु जिंदगी या नावाने २४ तास आरोग्य सुविधा पुरविण्याचा उपक्रम प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या वैद्यकिय सुविधांमध्ये २४ तास कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकिय उपकरणांसहित दोन कार्डियाक अँब्युलन्स, रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून दोन ब्लड डोनेशन व्हॅन, कर्करोग निदान व्हॅन आणि शितपेटीसह दोन मोक्षरथ अशा सर्व वैद्यकिय सुविधा ठाणेकर नागरिकांना २४ तास मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचं आज शक्तीस्थळावर लोकार्पण करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading