कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान

कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी म्हणून केंद्रीय गृहमंत्री पदकानं त्यांचा गौरव करण्यात आला. ममता डिसोझा यांनी आनंदनगर कोपरी परिसरात मोबाईल चोरी आणि घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला पकडल्याबद्दल त्यांच्यासह गुन्ह्याचा तपास करणाऱ्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील कौतुक करुन त्यांना सन्मानित केले. आनंदनगर कोपरी परिसर मोबाईल चोरी आणि घरफोडीपासून लवकरच मुक्त करु असा विश्वास ममता डिसोझा यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading