आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन

आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. फेस्टीवलचे यावर्षीचे हे सातवे वर्ष आहे. अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. यावर्षी वसुधैव कुटुंबकम् ही थीम असून उपवन तलाव येथे २६ ते २९ जानेवारी दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाला १००० पेक्षा जास्त शाळकरी मुले उपस्थित राहणार असून चार दिवसात ६०० पेक्षा जास्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होणार आहे. सर्व कलाकार ओपन लीग परिसरातील चार विविध सुसज्जित स्टेजवर आपली कला सादर करणार आहेत. तसेच या महोत्सवात भरपूर स्टॉल्स उपलब्ध आहे या स्टॉल्समध्ये हँडीक्राफ्टचे स्टॉल्स आणि विविध प्रकारच्या खाण्यांचे फूड स्टॉल असल्यामुळे याचा खवय्यांना मनसोक्त आनंद घेता येईल. लाईट आणि लेझर शो, आर्ट आणि क्राफ्ट वर्कशॉप, एडवेंचर स्पोर्ट्स, विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल ला कोणतेही तिकीट नाही. उदित नारायण, डॉ जसबिंदर नरुला, इंडियन आयडल सीजन 12 चा विजेता पवनदीप राजन, मैथिली ठाकूर तसेच सगुण निर्गुण विदुषी कलापिनी कोमकली, सावनी शेंडे, पंडित भीमना जाधव, पंडित अनिंदो चॅटर्जी, दीपिका भिड़े भागवत, सारंगी वेदक, संगीत मिश्रा, लिओडेल ऑस्ट्रेलिया हे सर्व कलाकार महोत्सवात सहभागी होणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading