अबोली रिक्षा चालक व ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनांच्या रॅलीने आरटीओच्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप निमित्ताने ठाण्यातील महिला अबोली रिक्षा, दुचाकी  तसेच ठाण्यातील मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कुलची चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली. रॅलीचे उदघाटन मराठी सिने आणि मालिकांमधील अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षेचे महत्व कळावे, यासाठी ही रॅली काढण्यात आली. लुइसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून रॅलीस सुरुवात झाली. या रॅलीत सुमारे ५० दुचाकी, ३० अबोली ऑटोरीक्षा, ठाण्यातील मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कुलची २५ चारचाकी वाहने यांनी सहभाग नोंदविला. रॅली लुईसवाडी येथून नितीन कंपनी- कॅडबरी कंपनी-पोखरण रोड नंबर-१-उपवन तलाव-टिकुजिनी वाडी रोड, मानपाडा- माजीवडा मार्गे पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय लुईसवाडी येथे येवून सांगता करण्यात आली. अश्विनी महांगडे यांनी सर्वांनी रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करून महिलांना सुरक्षितपणे प्रवास करण्याची हमी देणाऱ्या आणि त्यासाठी ऑटोरिक्षाचे सारथ्य करणाऱ्या उपस्थित अबोली रिक्षा चालक महिलांचे कौतूक केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading