आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉल प्रकरणी अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज वर्तकनगर पोलीसांनी अटक केली. विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी त्यांना आज चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतलं. जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो काही दिवसापूर्वी बंद पाडला होता आणि त्याचवेळी मारहाणीचा प्रकारही घडला होता. हर हर महादेव या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस उभे ठाकले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा चित्रपटाचा शो प्रेक्षकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला होता. जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्यावरून हा चित्रपट बंद पाडला होता. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलीसांनी आज आव्हाड यांना अटक केली आहे. तर आव्हाड यांनी ट्वीट करून पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता आपण लढायला तयार आहोत. आपल्याला फाशी झाली तरी चालेल पण गुन्हा केला नाही तर कबुल करणार नाही असं म्हटलं आहे. आव्हाड यांनी पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर पोलीसांनी काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading