आमदार जितेंद्र आव्हाड आणि सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता

आमदार जितेंद्र आव्हाड आणि सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता दिसत आहे. आव्हाड यांनी काल सभागृहात त्यांना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आता त्यांनी या प्रकरणातील साक्षीदार समोर आणला आहे. या संदर्भात आव्हाड यांनी फिरोज या व्यक्तीला माध्यमांसमोर आणल. फिरोजला हत्यार आणण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये नेण्यात आल.. त्यानंतर पालिकेत बैठक झाली. त्यावेळी काही आमिष देखील देण्यात आली मात्र फिरोजने त्या कामासाठी नकार दिला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला धमकी आल्यानंतर फिरोज समोर आला. फिरोजने आव्हाड यांना या संदर्भात सावध राहण्याचा सल्ला दिला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading