आवक वाढल्यानं कलिंगडाचे भाव उतरले-शेतकरी आणि ग्राहक राजाची मात्र लूट.

एकीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या पीकांना योग्य भाव मिळत नसल्यची तक्रार असतानाचं दुसरीकडे शहरातील नागरीकांना मात्र भरमसाठ भाजीपाला, फळ तसेच अन्य-धान्य खरेदि कराव लागत आहे. मग यास जबाबदार नक्की कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. अगदी सध्याचं उदाहरण घ्यायच म्हणल तर कलिंगडाच घेता येईल.
एपीएमसी मार्केटमध्ये कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून दिवसाला दीडशे ते दोनशे गाड्यांची आवक होत आहे. त्यामुळे कलिंगडाचे भाव उतरले आहेत. पंधरा ते वीस रुपयांना किलोमागे विकले जाणारे कलिंगड दहा रुपयांवर आलं आहे. बाजारात मात्र कलिंगडासाठी किमान ५० रुपये मोजावे लागत आहेत. तर आवक जास्तीचे झाल्याने हे भावही कोसळणार असल्याची भीती यावेळी व्यापारी व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलिंगड मोठ्या प्रमाणामध्ये एपीएमसी मार्केटमध्ये विक्री साठी येत. मात्र या वेळेला ग्राहकांचीही खूप कमतरता जाणवत असल्याची प्रतिक्रिया कलिंगड विक्रेत्यांनी दिली असून हा माल सांगली, सोलापूर, बीड, वाडा भिवंडी, उस्मानाबाद ,नाशिक, यवतमाळ वाडा श्रीवर्धन तसेच पर राज्यातून तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या ठिकाणाहून येतो. त्यामुळे अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगडाची आवक झाली असल्याने दर कोसळले आहेत. पण किरकोळ बाजारात मात्र कलिंगडाला चढा भाव आहे. यामध्ये पीकवणाऱ्यच्या हाती काहीच लागत नसुन मधला व्यापारी मात्र शेतकरी आणि ग्राहकांना लुटत आहे. यासाठी खर तर योग्य नियोजनाची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading