आंबा महोत्सवाची धूम यंदा ठाणेकरांना अनुभवता येणार

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर यंदा निर्बंधमुक्त आंबा महोत्सवाची धूम ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव यंदा १ ते १२ मे या कालावधीत नौपाड्यातील भगवती मैदानात होणार असून कोकणातील अस्सल हापुस आंब्याची चव खवय्यांना चाखता येणार आहे. अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. या आंबा महोत्सवाच्या माध्यमातुनकोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची थेट भेट होऊन लाखोंची उलाढाल होत असते. यात शेतक-यांना फायदा होतोच शिवाय ठाण्यातील ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंबा योग्य दरात मिळतो. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे.२०१९ ला ३ लाख २० हजार मेट्रिक टन, २०२० ला २ लाख ५६ हजार मेट्रीक टन, २०२१ ला १ लाख २८ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन झाले आहे.गेल्या चार वर्षापासुन शेतकरी पिचुन गेला आहे, मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकरी व्यथित आहे. नुकसानीचे पंचनामे झाले परंतु अद्याप नुकसान भरपाईच दिली नाही. तेव्हा शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी हा आंबा महोत्सव आयोजीत केला असल्याचे केळकर यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेली दोन वर्षे आंबा महोत्सव आयोजित करता न आल्याने ऑनलाईन विक्रीद्वारे ‘आंबा आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. यावर्षी भगवती मैदानात आंबा महोत्सवात प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध ठेवल्याचे संजय केळकर यानी सांगितले. यासाठी मुंबई – ठाण्यातील खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. दापोली कृषी विद्यापीठाच्या वतीने आंबा महोत्सव स्थळी आंब्याच्या विविध प्रजातीचे प्रदर्शन आयोजीत केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातुन आंबा आणि त्याच्या प्रजातींविषयी दुर्मिळ माहिती नागरीकांना मिळणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading