संघर्षतर्फे खारेगाव येथे सोनू निगम लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन

गेले दोन वर्षे कोरोनामुळे घरातच बंदीस्त झालेल्या ठाणेकरांना शनिवारी जल्लोष करण्याची संधी संघर्ष या संस्थेमुळे मिळणार आहे. येत्या शनिवारी खारीगाव येथील 90 फूट रोडवर सोनू निगम लाईव्ह 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रख्यात गायक सोनू निगम हा प्रथमच ठाण्यात आपल्या कलेचे प्रदर्शन करणार आहे. कोरोनामुळे सर्वच नागरिक बेजार झाले होते. सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंधांमुळे नागरिकांना जल्लोष साजरा करणे शक्य होत नव्हते. आता कोरोनाचे संकट टळले आहे. त्यामुळेच संघर्षच्या वतीने सोनू निगम लाईव्ह 2022 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. सोनू निगम प्रथमच ठाण्यात शो करत असल्याने या कार्यक्रमाबद्दल उत्सुकताही ताणली गेली आहे. या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष साजरा करावा असे आवाहन संघर्षच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading