अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-यास गोव्यातून अटक तर मुलीची सुटका

गुजरातमधील तापी जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून गोव्यातील पणजी येथे लपवून ठेवणा-या हुजेफा गाडीवाला याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि गुजरात पोलीसांनी संयुक्त कारवाईत अल्पवयीन मुलीची सुटका करत अटक केली आहे. गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पूर्वीच वातावरण तप्त असताना हुजेफा गाडीवाला यानं अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेण्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ ही मुलगी राहत असलेल्या व्यास या गावात बंद पाळण्यात आला होता. व्यास पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राकेश पटेल यांनी ठाणे पोलीसांशी संपर्क करून या प्रकरणातील आरोपी हा मुलीसह ठाणे-मुंबई परिसरात असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार गुजरात पोलीस आणि ठाणे पोलीसांनी संयुक्त मोहिम सुरू केली. ठाणे पोलीसांनी विविध पथकं बनवून मुंबई-गोव्यामध्ये हुजेफा गाडीवाला याचा शोध सुरू केला. खब-यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे आणि गुजरात पोलीसांच्या पथकानं अपहृत अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करत हुजेफा गाडीवाल्याला ताब्यात घेतलं. अपहृत मुलगी आणि आरोपींना व्यास पोलीसांच्या स्वाधीन केल्याची माहिती काल एका पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading