अतिक्रमण मुक्त पदपथ, खड्डेमुक्त रस्ते आणि अनधिकृत बॅनर्स तसंच पोस्टरमुक्त शहर करण्यासाठी उद्यापासून ३ दिवस विशेष मोहिम

अतिक्रमण मुक्त पदपथ, खड्डेमुक्त रस्ते आणि अनधिकृत बॅनर्स तसंच पोस्टरमुक्त शहर करण्यासाठी ३ दिवस विशेष मोहिम राबवली जाणार आहे. उद्यापासून शुक्रवारपर्यंत ही तीन दिवसीय मोहिम चालवली जाणार असून गरज पडली तर पुढील दोन दिवस ही मोहिम वाढवण्यात येणार आहे. महापालिका अधिका-यांच्या एका बैठकीत पालिका आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष झाल्यास सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तीन दिवस चालणा-या या मोहिमेत पदपथावरील किती पक्की बांधकामं आणि किती तात्पुरती बांधकामं हटवण्यात आली याचा अहवाल रोजच्या रोज सादर करण्याचं बंधनकारक केलं आहे. या कारवाईबरोबरच शहरातील सर्व अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स निष्कासित करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती आणि खड्डे भरण्याबाबत प्रभाग स्तरावर प्रत्येक रस्त्याची पाहणी करून त्यावर कार्यवाही करावी असंही पालिका आयुक्तांनी सूचित केलं आहे. महापालिका उत्पन्नाचा आढावा घेऊन कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिका-यांनी दक्षता घ्यावी असंही या बैठकीत पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading