वाडिया रूग्णालयातील सीबीनॅट यंत्रामुळे क्षयरोगाची चाचणी आता अवघ्या दोन तासात

क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाकरिता त्याचे अचूक आणि त्वरीत निदान होण्यासाठी ठाणे महापालिका आणि इंडियन ऑईल यांच्या सहकार्याने वाडिया रूग्णालयामध्ये अत्याधुनिक सीबीनॅट मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. सीबीनॅट मशिनमुळे क्षयरोगाचे निदान अवघ्या दोन तासात होणार आहे. खाजगी रूग्णालयात अडीच ते तीन हजार इतका खर्च असणारी ही चाचणी वाडीया रूग्णालयात विनामूल्य केली जाणार आहे. राज्यामध्ये मुंबईनंतर ठाण्यातच हे मशिन असून या मशिनवर एकावेळी ८ रूग्णांच्या क्षयरोगाची चाचणी करता येते. खाजगी रूग्णालयांमधील रूग्णांची चाचणी देखील येथे मोफत करण्यात येणार असून जास्तीत जास्त रूग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. क्षयरोगाचं निदान करण्यासाठी वेगवान चाचणी करण्याकरिता सीबीनॅट मशिन उपयुक्त ठरणार आहे. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून सहा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांच्या उपचारानंतर रूग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. यावेळी क्षयरोगाची लागण होऊनही दहावी-बारावी शालांत परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading