अजित पवार हे भाजप मध्ये येत असतील, तर त्यांना भाजप चे हिंदुत्व मान्य आहे – नरेश म्हस्के

अजित पवार यांचे महायुती मध्ये स्वागत करू, पवारांना मानपान देण्याचा प्रयत्न इथे होईल अजित पवार हे जर आताच्या सरकारमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे असं प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलं. महाराष्ट्रामध्ये एकतर्फी शिवसेना आणि भाजपचे सरकार हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल ही पार्श्वभूमी नाही आहे. काहीजण बातमी पेरण्याचे काम करत आहेत. जो न्यायालयाचा निकाल आहे तो सत्याच्या बाजूने होणार आहे. आमची बाजू सत्य आहे. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या विरोधात कोणी मतदान केले नव्हते. त्यामुळे न्यायालयाचा निकाल निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल पण आमच्या बाजूने लागेल. १६ आमदार अपात्र होणार याचा काही संबंध नाही. ज्या माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला आणि कार्यकर्त्यांसाठी झटत राहिला. त्यांना सभेमध्ये भाषण करू दिले गेले नाही. बसण्याची खुर्ची खालच्या दर्जाची दिली जाते आणि इतरांना उच्च दर्जाची खुर्ची दिली जाते. त्यामुळे हा त्यांचा अपमान केला जात आहे. नक्कीच त्यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे ते हा निर्णय घेतील, त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुर्णपणे कंट्रोल आहे असं म्हस्के म्हणाले. अजित पवार हे जर याठिकाणी येत असतील तर सर्व तत्व मान्य करून येत असतील. भाजप मध्ये येत असतील तर त्यांना भाजप चे हिंदुत्व मान्य आहे. ज्या काही गोष्टी होणार आहेत,त्यावर वरिष्ठ नेते भूमिका घेतील, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊन ही गोष्ट होईल. हेल्पिंग हॅण्ड मिळाल्यावर आणखी जोमाने काम करतील, या महाराष्ट्रामध्ये काम वाढेल आणि काम करणारे सरकार आणखी मजबूत होईल असंही नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading