वागळे इस्टेटमध्ये एक सहा फूट घोणस आढळल्यानं खळबळ उडाली. वागळे इस्टेटमधील शिवसेना शाखेच्या जवळील कांबळे चाळ परिसरात ही सहा फूट घोणस आढळून आली. ही ६ फूट घोणस आढळल्यावर पोलीस आणि सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं. सर्पमित्र अजय जवीर यानं ही घोणस पकडली तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.