TMC

मोबाईल व्हॅनवरील जाहिराती काढून सर्व मोबाईल व्हॅन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत

जाहिरात फलकामुळे कोणतीही जिवितहानी होऊ नये याकरिता ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील मोबाईल व्हॅनवरील जाहिराती काढून सर्व मोबाईल व्हॅन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. जाहिरात फलक पडून जिवितहानी होऊ नये यासाठी महापालिका क्षेत्रातील मोबाईल व्हॅनवरील जाहिराती काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कलरकेम, गांधीनगर, सुभाषनगर, माजिवडा, पूर्व द्रूतगती महामार्ग, रहेजा कॉम्प्लेक्स, वसंतविहार, बाटा कंपनी, कॅडबरी नाका, लेरिडा हॉटेल, पोखरण रोड नंबर १, रेमण्ड कंपनी, समतानगर नाका, मुल्लाबाग येथील मोबाईल व्हॅन तसंच ट्रॉलीवरील जाहिरात फलक काढण्यात आले आहेत. मोबाईल व्हॅनवरील जाहिराती काढून सर्व व्हॅन उड्डाणपूलाखालच्या मोकळ्या जागेत हलवण्यात आल्या आहेत. ट्रॉलीवरील जाहिरात फलक, ट्रॉलीच्या तळावर उतरवण्यात आले आहेत.

Comment here