डोंबिवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकास १ लाख रूपयांची लाच स्वीकारताना अटक

डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल वाघ यांच्यासह दोघांना १ लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचे मालक कोठारी यांच्याविरूध्द दाखल गुन्ह्यात तक्रारदारांना न अडकवण्यासाठी आणि तक्रारदारांचे गोल्ड ज्वेलरी मेकींगचे पेपर, गुमास्ता लायसन्स तसंच इतर कागदपत्रं परत करण्यासाठी सुनिल वाघ यांनी १० लाख रूपयांची मागणी केली होती. काल या १० लाखांपैकी पहिला हफ्ता म्हणून १ लाख रूपये महेश पाटील आणि प्रकाश दरडा यांनी स्वीकारले. ही रक्कम त्यांनी सुनिल वाघ यांच्यासाठी स्वीकारल्याचं तपासात पुढे आलं. त्यामुळं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या तिघांनाही अटक केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading