नाशिक-पुण्यातील दुचाकी जाळण्याचं लोण आता ठाण्यातही येऊ पाहत असल्याचं दिसत आहे. आज पहाटे कौशल्य रूग्णालयाजवळ ९ दुचाकी आगीत खाक झाल्या.सुरेखा अहिरे, अमित खापरे यांची ॲक्टीव्हा, सुझुकी गिस्सर, चंद्रकांत जोशी यांची यामाहा एफ झेड, संतोष भोईर यांची टीव्हीएस वेगो तसंच दोन ॲक्टीव्हा आणि एक होंडा सिबी युनीकॉड या अज्ञातांच्या अशा एकूण ९ गाड्या जाळण्यात आल्या. या गाड्या का आणि कोणी जाळल्या याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.