घोडबंदर रोड परिसरात आगरी कोळी भवन आणि ज्येष्ठ नागरिक केंद्र उभारण्याची प्रताप सरनाईकांची मागणी

घोडबंदर रोड परिसरात आगरी कोळी भवन आणि ज्येष्ठ नागरिक केंद्र उभारावं अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महानगरामध्ये आगरी कोळी बांधवांची संख्या अधिक आहे. त्यांची संस्कृती जतन करण्यासाठी त्या भवनाची निर्मिती होणं गरजेचं आहे. महापालिकेच्या विकासामध्ये या समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. विकास कामांसाठी आगरी समाजानं मोठ्या प्रमाणावर महापालिकेला जमीन देऊन सहकार्य केलं आहे. घोडबंदर परिसरात जास्तीतजास्त शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे आगरी कोळी आणि आदिवासी समाजाचे आहेत. त्यांनीही यासाठी पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेनं वचननाम्यात आगरी कोळी भवनाच्या निर्मितीचं आश्वासन दिलं होतं. आगरी कोळी समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी आणि शहरात येणा-या नवीन नागरिकांना याची माहिती होण्यासाठी असं भवन उभारण्याची गरज असून या महिन्यात होणा-या सर्वसाधारण सभेमध्ये आगरी कोळी भवनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: