कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आडकाठी केल्यामुळे मुंब्र्यामधील दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंब्रामध्ये शादी महल रोड, अमृतनगर येथे भाजीपाला आणि इतर दुकाने बंद करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गस्त घालण्यासाठी फिरत होते. यावेळी दुकाने बंद न करण्याबाबत इतर दुकानदारांना चिथावणी देणे, शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कारणास्तव अमृतनगर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.