वन विभागानं मांडूळाची तस्करी करण्याच्या उद्देशानं दोन मांडूळांना ठाण्यात आणणा-या तिघांना जेरबंद केलं आहे. मांडूळाची तस्करी करण्यासाठी दोन मांडूळांना ठाण्यात आणलं जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वन विभागानं सापळा रचून दोन आरोपींसह दोन मांडूळांनाही हस्तगत केलं. मांडूळाला परदेशात कोट्यावधी रूपयांची किंमत मिळते म्हणून हे दोन मांडूळ आणण्यात आले होते. सुधागड, पाली परिसरातील आदिवासीकडून या दोन मांडूळांना या आरोपींनी आणलं होतं. पकडलेल्या दोघांकडून पालीतील आणखी एका आरोपीची माहिती पोलीसांना मिळाल्यानं पोलीसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.