भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणा-या शाळेच्या जवळच होमहवनानं खळबळ

भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मतदान यंत्रे ठेवलेल्या प्रेसिडेन्सी शाळेबाहेर काहीजण होमहवन करताना आढळल्यानं खळबळ उडाली आहे. भिवंडी लोकसभेअंतर्गत सहा विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रं एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी स्कूलमध्ये ठेवण्यात आली आहेत. या शाळेवर त्रिस्तरीय पहारा आहे. कोणालाही जाण्याची परवानगी नाही. या शाळेच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर कारमध्येच होमहवन सुरू होतं. याची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार केली. पोलीसांनी कारची तपासणी केली असता कारच्या डिकीमध्ये होमहवनाची सामुग्री आढळली. काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांनीही या ठिकाणी येऊन होमहवन करण्यासाठी हीच जागा मिळाली का असा प्रश्न कारचे मालक श्रीकांत पंदिरे यांना केला. त्यावेळी त्यांनी आपण गोदाम खरेदीसाठी या ठिकाणी आलो होतो. सूर्यास्ताची वेळ झाल्यानं कारमध्येच होमहवन केले असं त्यांनी स्पष्टीकरण दिले. यामध्ये कोणताही दुसरा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading