मद्यपी टोळक्यानं वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेमलेल्या दोघा ट्राफिक वॉर्डनवर जीवघेणा हल्ला

मद्यपी टोळक्यानं वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेमलेल्या दोघा ट्राफिक वॉर्डनवर जीवघेणा हल्ला होण्याची घटना घडली आहे. मोसीन सय्यद आणि योगेश पाटील असे या ट्रॅफीक वॉर्डनचे नाव असून यातील सय्यदवर सिव्हील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील वाहतूक पोलीसांच्या मदतीसाठी सिक्युअर वन या ठेकेदारामार्फत ट्रॅफीक वॉर्डन नेमण्यात आले आहेत. त्यानुसार सय्यद आणि योगेश हे दोघे वागळे इस्टेट भागातील साठेनगर नाक्यावर वाहतूक नियंत्रणाचं काम बजावत होते. वाहनांची वर्दळ कमी असल्यानं दोघेही रस्त्याजवळच्या रिक्षात बसून मोबाईलमध्ये व्हीडीओ पाहत असताना शेजारील रिक्षात बसून मद्य पिणा-या टोळक्यानं नाहक वाद सुरू केला आणि सय्यदला स्टील पट्टीनं तसंच ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर तिघांनी पळ काढला. श्रीनगर पोलीसांनी आकाश भालेराव आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading