आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा ठाणे कारागृहात स्मृतीस्तंभ उभारणार

आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांच्यापासून तरुणांना कायम प्रेरणा मिळत राहावी, यासाठी राघोजी भांगरे यांनी बलिदान दिलेल्या ठाणे कारागृहातील ठिकाणावर आमदार निधीतून स्मृतीस्तंभ उभारण्यात येईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

राघोजी भांगरे या क्रांतीवीरांच्या स्मारकाचं नूतनीकरण होणार

ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास भोगला आहे. याच कारागृहामध्ये राघोजी भांगरे या आदिवासी समाजातील क्रांतीकारकास फाशी देण्यात आली होती. मात्र, या क्रांतीवीराचे स्मारक अडगळीत गेले असल्याने त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारागृहास भेट देऊन पाहणी केली.

Read more