पावसाळ्यापूर्वी जोगिला तलाव पुनर्जिवित होणार

ऐतिहासिक जोगिला तलावाच्या पुनरूज्जीवनाचं काम युध्दपातळीवर सुरू असून तलावाच्या गॅबियन भिंतीचं बांधकाम तात्काळ पूर्ण करून येत्या पावसाळ्यात पाणी साठवलं जाईल असा विश्वास महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

Read more

ठाणे महापालिकेला जोगिला तलावाच्या पुनर्नवीनीकरणासाठी वॉटर डायजेस्ट वॉटर पुरस्कार

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नानं जोगिला मार्केट येथील सिमेंट कॉन्क्रीटमध्ये निद्रिस्त झालेल्या जोगिला तलावाच्या पुनर्नवीनीकरण उपक्रमाला जलसंपदा मंत्रालय, नदी विकास आणि गंगा कायाकल्प सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन आणि युनेस्कोच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणा-या वॉटर डायजेस्ट वॉटर ॲवॉर्डस् २०१८-१९ या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

Read more