आमदार संजय केळकर यांच्या हस्ते अर्जुन मढवी २०-२०क्रिकेट सामन्यांचे उदघाटन

गेली साडेचार दशके अखंडितपणे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असून त्यातून अनेक खेळाडू भारतीय संघाला मिळाले. अशा स्पर्धांतूनच ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटू पुढे येतील, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.

Read more

संकल्प फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचा हीरक महोत्सवी मित्र मेळावा

जलद गोलंदाजीप्रमाणे फिरकी विशेषतः लेगब्रेक गोलंदाज हे फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचा हुकमी एक्का असायचा. या अनुभवाचा फायदा युवा क्रिकेटपटूंना देऊन दर्जेदार लेगब्रेक घडवण्याचा संकल्प फ्रेंडशिप क्रिकेट क्लबच्या हीरक महोत्सवी मित्र मेळाव्यात करण्यात आला.

Read more

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने राखले विजेतेपद

पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या निर्णायक लढतीत गोलंदाजांनी बजावलेल्या कामगिरीला फलंदाजांनी तोलामोलाची साथ दिल्यामुळे एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने अ संघाचा आठ विकेट्सनी पराभव करत विजेतेपद कायम राखले.

Read more

मुंबई स्पोर्टिंग युनियनच्या विजयात विजय यादव चमकला

विजय यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई स्पोर्टिंग युनियनने माही स्पोर्ट्सचा चार विकेट्सनी पराभव करत मर्यादित ४५ षटकांच्या डीएससीए चषक वासंतिक क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.

Read more

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात क्रिकेटच खेळलं पाहिजे – दिलीप वेंगसरकर

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खेळपट्टी ही क्रिकेटसाठी उत्तम असून या मैदानात फक्त क्रिकेटच खेळलं पाहिजे असं मत भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं.

Read more

सी.के.नायडू चषक अंतर्गत रविवारी ठाण्यात रंगणार मुंबई विरुद्ध बंगाल क्रिकेट सामना

सी के नायडू चषक क्रिकेट सामना दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात येत्या रविवारी होत असून मुंबई विरूध्द बंगाल या सामन्याचं उद्घाटन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

Read more

अस्सल ठाणेकर संघाला विजय मिळवून देत महापालिका आयुक्तांनी पटकावला मॅन ऑफ द मॅच किताब

ठाणे महापालिका आयोजित सेलिब्रिटी क्रिकेट लिगमध्ये खतरनाक मुळशी संघानं पराक्रमी पुणे संघावर विजय मिळवत महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिगच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर प्रदर्शनीय सामन्यात महापालिका आयुक्तांनी नाबाद ४० धावांची धडाकेबाज खेळी करत अस्सल ठाणेकर संघाला विजय मिळवून देत मॅन ऑफ द मॅच हा किताबही पटकावला.

Read more

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनावर तयार करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नुतनीकृत खेळपट्टीचं उद्घाटन काल पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं.

Read more

अथर्वच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आणि सौख्य मढवीच्या झंझावती शतकामुळे सरस्वतीचा मोठा विजय

अथर्व कोशिरेड्डीचा अष्टपैलू खेळ आणि सौख्य मढवीच्या शतकी खेळीच्या जोरावर सरस्वती विद्यालयानं चंद्रकांत पाटकर विद्यालयाचा १९२ धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षाखालील घंटाळी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी लढतीत स्थान मिळवले.

Read more