संकल्प फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचा हीरक महोत्सवी मित्र मेळावा

जलद गोलंदाजीप्रमाणे फिरकी विशेषतः लेगब्रेक गोलंदाज हे फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचा हुकमी एक्का असायचा. या अनुभवाचा फायदा युवा क्रिकेटपटूंना देऊन दर्जेदार लेगब्रेक घडवण्याचा संकल्प फ्रेंडशिप क्रिकेट क्लबच्या हीरक महोत्सवी मित्र मेळाव्यात करण्यात आला.
क्लबचे सचिव प्रल्हाद नाखवा म्हणाले, अष्टपैलू क्रिकेटपटू हे संघाचे बलस्थान असायचे. त्यात लेगब्रेक गोलंदाज संघासाठी अनेकदा तारणहार ठरले. त्यामुळे हीरक महोत्सवी मेळाव्याची तयारी करताना लेगब्रेक गोलंदाजासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याचा निर्णय झाला. करोनानंतर आता क्लबचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करताना क्लबच्या ज्या सदस्यांनी वैवाहिक जीवनाचे अर्धशतक पूर्ण केलं आहे अशा दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात आला. याशिवाय क्लबच्या या साठ वर्षातील संस्मरणीय क्षणांच्या कृष्णधवल, रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन क्लबचे ८८ वर्षीय जेष्ठ क्रिकेटपटू मदन नाखवा यांच्या हस्ते करण्यात आले. चेंदणी कोळीवाड्यातील कुंभारवाडा मैदानावर टेनिसबॉल क्रिकेटप्रेमी युवकांनी एकत्र येत १९६० साली फ्रेंडशिप क्रिकेट क्लबची स्थापना केली. ठाण्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर होणाऱ्या अनेक क्रिकेट स्पर्धातून क्लबने स्पृहणीय यश संपादन केले. १९७२ साली सिझन बॉल क्रिकेटला सुरुवात केल्यावर १९७६ साली कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित २२ व्या बाळकृष्ण बापट ढाल उपनगरीय क्रिकेट स्पर्धेत क्लबने उपविजेतेपद मिळवले होते. त्यानंतर अकरा वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा करण्याचा उपक्रम क्लबने सुरु केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading