भारतीय जनता पक्षाचे सुधीर बर्गे यांच्यासह दोघांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. हिरानंदानी बिल्डरकडे बर्गे यांनी खंडणी मागितली होती. खंडणीसाठी धमकी दिल्याबद्दल बर्गेंना अटक करण्यात आली आहे. सुधीर बर्गे यांच्यासह माहिती अधिकारी कार्यकर्ते शौकत मुलानी, आरिफ इराकी यांनाही अटक करण्यात आली असून माहिती अधिकार आणि जनहित याचिकेच्या माध्यमातून खंडणी उकळत असल्याची माहिती आहे. सुधीर बर्गे हे ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. सध्या ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत.
