ज्येष्ठ पत्रकार अशोक बल्लाळ यांच निधन

ज्येष्ठ पत्रकार अशोक बल्लाळ यांच कर्करोगानं निधन झालं.ते ७० वर्षाचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते.मुंबई कोकण सकाळचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले होते.पत्रकारितेत त्यांनी विपूल लेखन केलं.त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगी, जावई असा परिवार आहे.

नगरसेवक मुकूंद केणी यांच निधन

कळव्यातील नगरसेवक मुकूंद केणी यांच निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्याच्यांवर उपचार चालू होते पण आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या मागे पत्नी नगरसेविका प्रमिला केणी,मुलगा,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

न्यायालयीन कामकाज एकाच सत्रात करा
ठाणे जिल्हा वकिल संघटनेचे आर्जव

ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिल मंडळीही धास्तावली आहेत.सोमवारपासुन लॉकडाऊन शिथील केला असला तरी,सध्या न्यायालयीन कामकाज करण्यासारखी परिस्थिती नसल्याने 30 जूनपर्यत न्यायालयीन कामकाज एकाच सत्रात चालवावे.अशी विनंती ठाणे जिल्हा वकील संघटनेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे करण्यात आली आहे.यासह इतर मागण्यांबाबतचा ठराव 7 जून रोजी पार पडलेल्या संघटनेच्या विशेष सर्वसाधारण … Read more

पालकमंत्र्यांनी वाढवले पोलिसांचे मनोबल

कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर पोलीस दल मैदानात उतरले आहे,या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठाणे पोलीस सुद्धा दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत.

Read more

बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे महानगरपालिका आणि स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत विविध ठिकाणी देखभाल आणी दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 पर्यत ठाणे महानगरपालिकेचा स्वतःचा पाणी पुरवठा आणी स्टेम प्राधिकरणकडून होणारा पाणी बंद पुरवठा राहणार आहे.

Read more