बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे महानगरपालिका आणि स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत विविध ठिकाणी देखभाल आणी दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 पर्यत ठाणे महानगरपालिकेचा स्वतःचा पाणी पुरवठा आणी स्टेम प्राधिकरणकडून होणारा पाणी बंद पुरवठा राहणार आहे.

बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2019 रोजी विविध ठिकाणी देखभाल आणी दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading