ब्रेक निकामी झाल्याने अपघात – सिमेंट मिक्सरखाली चालक दबला

ब्रेक निकामी झाल्याने नियंत्रण सुटलेला सिमेंट मिक्सर उलटल्याची घटना गुरुवारी सांयकाळी उपवन तलावासमोरील येऊर चेकपोस्टनजीक घडली.या दुर्घटनेत मिक्सरखाली दबल्याने चालक समीर शेख (32) हा गंभीर जखमी झाला.अपघातानंतर घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल,वर्तकनगर पोलीस आणि ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन पथकाने धाव घेत हायड्रा क्रेन व इतर साधनाद्वारे बचावकार्य करून चालक शेख याला बाहेर काढले.अपघातात गंभीर जखमी झाल्याने … Read more

एटीएम चोरी प्रकरणात पोलिसांना अवघ्या 48 तासात पाच जणांना जेरबंद करण्यात यश

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एटीएम चोरी प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 48 तासात पाच जणांना अटक केली आहे. दहिसर ग्रामपंचायतीसमोर ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी त्यांनी पळून नेल होत. शिळ परिसरातील दहीसर ग्रामपंचायत क्षेत्रात एक्सिस बँकेचे एटीएम मशिन आहे.लॉकडाऊनमुळे रविवारी रात्री शुकशुकाट असल्याची संधी साधत सात ते आठ चोरट्यांनी हे एटीएम मशिनच चोरून नेले.या एटीएम मशिनमध्ये 17 लाख 96 … Read more

केबीसी’मधील लकी ड्रॉच्या मेसेजने हूरळून जाऊ नका,फसवणूक होऊ शकते – महाराष्ट्र सायबर चे आवाहन

कौन बनेगा करोडपती (केबीसी) या स्पर्धेत तुम्हाला पारितोषिक मिळालेले आहे. तुम्हाला लकी ड्रॉ लागला आहे. तुम्हाला कार गिफ्ट मिळणार आहे. अशा प्रकारचे मेसेज आले अथवा +92 या क्रमांकाने सुरु होणा-या नंबरवरून फोन आल्यास हुरळून जाऊ नका. तो तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी लावलेला सापळा असू शकतो. त्यामुळे खातरजमा करूनच प्रत्येक वेळी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करा. … Read more

ठाण्यात १००० खाटांच्या कोव्हिड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच सेवेत दाखल

ठाण्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या १ हजार खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.ठाण्यात करोनाची साथ आटोक्यात यावी आणि रुग्णसंख्या कमी व्हावी, यासाठी प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने संबंधित … Read more

शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा २४ तर काही ठिकाणचा १२ तास बंद

ठाणे महानगरपालिका स्टेम प्राधिकरण यांचेमार्फत होणारा पाणीपुरवठा त्यांच्या अत्यावश्यक विविध दुरूस्तीच्या कामाकरिता शुक्रवार दिनांक 12 जुन रोजी सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी शुक्रवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 9.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, पातलीपाडा, कासारवडवली, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा आणि मुंब्रा … Read more

घरोघरी ताप सर्वेक्षण आणि कॅान्टॅक्ट ट्रेसिंगला प्राधान्य द्या –
महापालिका आयुक्तांच्या सूचना

घरोघरी ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याबरोबरच कॅान्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या. दरम्यान मालेगावमध्ये यशस्वीपणे काम करणारे सनदी अधिकारी पकंज आशिया यांनी मालेगावमध्ये कशा प्रकारे काम केले याची माहिती या बैठकीत दिली. यावेळी सनदी अधिकारी आणि कोव्हीडसाठी नियुक्त विशेष अधिकारी रंजीत कुमार हेही उपस्थित होते.       कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरोघरी … Read more

ग्रामीणचे २६७ कोरोना रुग्ण बरे होऊन स्वगृही

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत २६७ कोरोना रुग्ण या महामारीवर मात करून स्वगृही परतले आहेत.सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २४९ कोरोना रुग्णावर उपचार सुरु आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. आता पावसाला सुरु होत असून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले … Read more

लाखो रुपयांच्या रोकडसह एटीएम मशिनच पळवले

कोरोनासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढली असून आता चोऱ्यामाऱ्या सुरू झाल्या आहेत.ठाण्यातील शिळडायघर येथील दहीसर नाका भागात चोरट्यांनी सुमारे 18 लाखांच्या रोकडसह एटीएम मशिनच चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी, सोमवारी शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांची चार पथके परिसरातील सीसी टीव्ही चित्रण तपासत आहे.दरम्यान,इतका मोठा दरोडा पडुनही बॅंकेने साधी दखलही घेतलेली … Read more