बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. २०१४ मध्ये थीम पार्कचं भूमीपूजन झालं. यासाठी २० कोटींचा खर्च अपेक्षित असून ४ वर्षात कोणतंही काम पूर्ण झालेलं नाही. जे काही काम झालं आहे तेही निकृष्ट दर्जाचं झाल्याचं संजय केळकर यांचं म्हणणं आहे. जनतेच्या पैशाची ही मनमानी असून यात कोणाला किती टक्केवारी गेली आणि काम कोणामुळे आणि कशामुळे थांबलं याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. अशा घोटाळ्यांमध्ये राजकीय कुरघोड्या न करता अंतिम सत्य बाहेर काढण्याचा आपला प्रयत्न असेल असं आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading