महापौर चषक दिव्यांग कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन

सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आम्ही देखील कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, व्यंग घेऊन जन्माला आलो असलो तरी आज आम्ही आमच्या व्यंगत्वावर मात करून असामान्य कर्तृत्व सिध्द करू शकतो हे आज याची देही याची डोळा अनुभवता आले. स्पर्धेच्या निमित्तानं या विशेष मुलांनी केलेलं संचलन, त्यांची जिद्द, मेहनत आणि त्यांच्या चेह-यावरील आनंद निश्चितच सर्वसामान्यांना प्रेरणा देणारा आहे असे कौतुकोद्गार महापौर नरेश म्हस्के यांनी काढले. ठाणे महापालिकेच्या वतीनं दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक दिव्यांग कला क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दोन दिवस चालणा-या या स्पर्धेत १९ शाळा आणि दिव्यांग संस्थांनी आपला सहभाग नोंदवला आहे. दिव्यांग कला क्रीडा महोत्सवात गतिमंद, कर्णबधीर, अस्थीव्यंग विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर धावणं, ५० मीटर रिले, गोळाफेक अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading