ठाणे महापौर चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांचं सुयश

ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सौजन्यानं आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केलं. ॲथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये श्री मावळी मंडळ शाळेनं १० पदकं, १ सांघिक पुरस्कार, ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह मोठं यश संपादन केलं. २०० मीटरमध्ये साई जठारनं तृतीय स्थापन पटकावलं. १०० मीटरमध्ये सार्थक जाधवनं तिसरं स्थान पटकावलं. १० वर्षाखालील ८० मीटर धावण्यात हर्ष उत्तेकरनं दुसरा तर साई जठारला तिसरा क्रमांक मिळाला. रिले रनिंगमध्ये १० वर्षाखालील गटानं प्रथम आणि ८ वर्षाखालील गटानं दुसरा क्रमांक पटकावला. हर्ष उत्तेकरनं ऊंच उडीमध्ये प्रथम, प्रगती दामोदरनं गोळाफेकमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading