ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत सम्मेद शेटेला प्रथम क्रमांक

ठाणे महापालिका आणि जिल्हा बुध्दीबळ संघटना यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत सम्मेद शेटे यानं प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख ४० हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. महापौर चषक बुध्दीबळ स्पर्धेचं उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक शंतनु भांबुरे, तृतीय क्रमांक महम्मद नुबैरशहा शेख, चतुर्थ क्रमांक चिन्मय कुलकर्णी तर पाचवा क्रमांक निखिल दिक्षीतनं पटकावला. या स्पर्धेत ६० स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत ७०० स्पर्धकांनी नोंदणी केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading