कळव्यामध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याचा २ हजार रहिवाशांना फटका

कळव्यामध्ये रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याचा २ हजार रहिवाशांना फटका बसला. कळव्यातील शिवाजी चौकात रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे. हे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅस कंपनीची गॅस वाहिनी फुटली. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल यांनी त्वरीत धाव घेतली. महानगर गॅस कंपनीच्या कर्मचा-यांनीही धाव घेत दुरूस्तीचं काम सुरू केलं आणि दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर गॅस वाहिनी दुरूस्त केली. त्यानंतरच गॅसचा पुरवठा होऊ शकला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading